काळ अवकाशातील विणीतले एक निर्वाद सत्य …..ओळख
वाऱ्याभोवती जग भ्रमंती करणाऱ्या धुळीसारखी स्वप्न ….ओळख
देहाला मन जोडणारी व मनाला देह जोडणारी विहीन कडी ओळख
निर्धास्तिपणे "मी " ची अनिभूति देणारी
पदपादि वाट शोधणारी ,
शणोक्षणी भान हरणारी "माया" … ओळख
सूर्यकिरननसमे डोळ्यांना प्रकाश व्
प्रकाशाला दृष्टी देणारी बुद्धि ,
पाऊसधारांसमे सागररूपी
समाजात होणारी शुद्धि …..ओळख
जुने ते नवे करणारी
अनंत आठवणींचा सडा वेचणारी ,
अंधारात स्वप्नांना जन्म देणारी ,
स्वप्नांना दिशा, दिशेला ध्येय, ध्येयाला वाट दाखवणारी
मनमोहक ध्वनि ....ओळख
गूढ़ प्रसंगांमधे सहारा देणाऱ्या सावलीची मार्मिकता
निराशेचा गुंता सोडवणाऱ्या उत्प्रेरक द्रव्यांची किमया
चुकलेल्या वाटेवर अडथळा बनणाऱ्या निसर्गाची भाषा
जिद्दीची ज्योत पेटत ठेवणाऱ्या शाश्वत शक्तीची निरागस्ता … ओळख
स्वतःचे स्वतःशी असलेले नातं
स्वतःचा स्वतःवर असलेला विश्वास
स्वतःला स्वतःमध्ये हरवणारा आरंभ
स्वतःचा स्वतःविरुद्ध असणारा युक्तिवाद … ओळख

No comments:
Post a Comment